सकाळी उपाशी पोटी १ ते २ ग्लास कोमट पाण्यासोबत अर्धा लिंबूचा रस किंवा जिरे पावडर टाकून प्या, त्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते.तसेच मेटाबॉलिझ्म देखील कमी होते.
जर वर्कआऊटसाठी वेळ काढता येत नसेल तर दिनश्चर्येत सक्रीयता वाढवा. कार्यालयात आणि घरात लिफ्टचा वापर करु नका. जिने चढणे ही चांगली कार्डिओ एक्सरसाईज असून त्याने कॅलरी बर्न होते.
आयुर्वेद आणि सायन्सच्या मते घास चावून खाल्ल्याने वजन वेगाने कमी होते.अन्न चावून खाल्ल्याने जेवन सहज पचते आणि ओव्हरइटिंगपासून बचाव होतो.
सकाळचा नाश्ता चुकवू नका, ब्रेकफास्टमध्ये स्प्राऊट्स, पोहे, दलिया, ओट्स वा अंड्या सारखे प्रोटीन तसेच फायबर असलेल्या पदार्थांचा समावेश करा.यामुळे बराच काळ भरलेले रहाते आणि अनहेल्दी क्रेव्हिंग्स होत नाही.
रिफाईंड शुगर आणि मैदायुक्त पदार्थ खाल्ल्याने वजन सर्वाधिक वाढते. साखरेच्या जागी गुळ वा मधाचा मर्यादित वापर करावा. मैद्यापासून तयार केलेले पदार्थ समोसा, पिझ्झा आणि बिस्कीट खाऊ नयेत.
कमी झोपणाऱ्या लोकांचे वजन वेगाने वाढते, कारण कमी झोपल्याने स्ट्रेस हार्मोन वाढते, त्यामुळे चरबी साठवली जाते. वेट लॉससाठी रोज ७ ते ८ तासांची झोप घेणे गरजेचे असते.
दुपारचे आणि रात्रीचे करण्याच्या अर्ध्या तास आधी एक ग्लास पाणी प्यावे. ज्यामुळे तुम्ही जेवताना एक्स्ट्रा कॅलरी पोटात जाण्यापासून वाचते.
रात्रीचे जेवण हलके असावे. सुप, खिचडी, उकडलेल्या भाज्या खाव्यात.झोपण्याच्या दोन ते तीन तास आधी जेवावे. म्हणजे रात्री ८ वाजता डिनर घ्यावी.
वजन घटवण्यासाठी आवडते पदार्थ सोडायची गरज नाही, मात्र त्यांचे प्रमाण कमी करावे. जेवण छोट्या ताटात घ्यावे. त्यामुळे पोट भरल्याची जाणीव लवकर होते आणि जेवण जास्त जात नाही.
पॅकबंद ज्युस, कोल्ड ड्रिंक्स आणि जास्त साखर असलेला चहा-कॉफी यात जास्त कॅलरी असते. त्याऐवजी नारळपाणी, बिना सारखेचा ग्रीन टी, ताक प्यावे.ज्याने वजन कमी होण्यास मदत होते.