Created By: Atul Kamble

Created By: Atul Kamble

23 June 2026

Created By: Atul Kamble

हायब्रिड आणि देशी भाज्या कशा ओळखायच्या ?

Created By: Atul Kamble

बाजारात अनेक हायब्रिड प्रकारच्या भाज्या मिळतात. ज्या हुबेहुब मुळ भाज्यांसारख्या दिसतात. परंतू त्यांची चव गावठी भाजीहून वेगळी असते.

हायब्रिड बियाणांच्या भाजीला वाढ जास्त असते. त्यामुळे उत्पन्न जास्त मिळते. या भाज्या वर्षांच्या बारा महिने मिळत असतात.त्यांच्या खराब होण्याचा धोका कमी असतो.

बाजारात काकडी पासून ते टोमॅटोच्या हायब्रिड प्रकार विक्रीस असतात. याचे आकार, रंग देशी भाजी सारखा असतो. परंतू त्यांना चव आणि सुंगध नसतो. तर हायब्रिड भाजी कशी ओळखतात ते पाहूयात

 देशी टोमॅटोचा गोलाकार आकार एकसमान नसतो. साल पातळ, गर नरम असतो. तर हायब्रिट टोमॅटो अंडाकार वा एकदम गोल आणि चमकदार असतात. त्यांची साल आणि गर देखील जाड असतो.

गावठी काकडी हलका पिवळा रंग असतो. आकार थोडा वाकडा आणि छोटा असतो तसेच रस जास्त असतो. तर हायब्रिड काकडी चमकदार डार्क हिरवी किंवा पोपटी असते हीची साल देखील जाड असते.

हायब्रिड गाड लाईट ऑरेंज रंगाची जरा जास्त क्रिस्पी असून प्रत्येक सिझनला मिळते. तर देशी गाजराची पाने डार्क हिरवी रसदार असतात आणि ती हिवाळ्यात येतात.

 देशी कोथिंबिरची पाने आकाराने लहान जास्त सुंगधित असते. मोठ्या पानाची कोथिंबिर हलक्या हिरव्या रंगाची असते आणि सुंगध कमी असतो.