चहा पिताना सिगारेट ओढली तर काय होईल?

18 ऑक्टोबर 2026

Created By:  Sunil Late

चहा पिताना सिगारेट ओढण्याची सवय अनेकांना असते, मात्र या दोन्हींचे एकत्र सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

धूम्रपानामुळे हृदयविकार आणि फुफ्फुसांच्या आजारांचा धोका वाढतो.

सिगारेटमधील निकोटिनमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावू शकतात, ज्यामुळे हृदयावर ताण येतो.

चहा आणि सिगारेटची वारंवार सवय असल्यास पचनाच्या समस्या आणि श्वसनाशी संबंधित त्रास उद्भवू शकतात.

चहा-सिगारेटची सवय सोडण्यासाठी तणावाची कारणे ओळखणे आणि कुटुंबीय किंवा मित्रांची मदत घेणे उपयुक्त ठरू शकते.