या शाकाहारी पदार्थ ठासून भरलंय प्रोटीन, आजमावून तर पाहा...
Created By: Atul Kamble
17 january 202
6
प्रोटीन तत्व नेहमीच शरीरासाठी खूपच महत्वाचे आहे. जर दीर्घकाळ हेल्दी राहायचे असेल तुम्हाला अधिक पोषक तत्व हवे, यात प्रोटीनचा देखील समावेश आहे.
- शरीरात प्रोटीनची कमतरता झाली तर स्नायू कमजोर होतात.केस गळती, त्वचेच्या तक्रारी सुरु होतात.त्यामुळे प्रोटीन रिच फूड्स खायला हवे.
काही शाकाहारी पदार्थाने देखील प्रोटीनची कमतरता दूर होते. चला हे पदार्थ पाहूयात कोणते ?
टोफू खाल्ल्याने शरीरात प्रोटीनची कमतरता पूर्ण होते. प्रोटीन शिवाय कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, मॅगनिझ, आणि फॉप्फरस सारखी पोषक तत्वे असतात.
किनोवा (Quinoa) किंवा राजगिरा हा प्रोटीनने भरपूर असतो. यात फायबर, कार्ब्ज, आयर्न आणि अन्य पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात.
डाळीत आणि बीन्समध्ये भरपूर प्रोटीन असते. त्यामुळे डाळीचा विविध प्रकारे आहारात समावेश करावा.
बदाम, अक्रोड, चिया सीड्स आणि भोपळ्याच्या बियामध्ये प्रोटीन शिवाय फायबर, हेल्दी फॅट्स, मॅग्नेशियम, झिंक, आयर्न आणि एंटी ऑक्सीडेंट्स असतात.ज्यामुळे शरीराला प्रोटीन मिळते.
शरीरातील प्रोटीनचे प्रमाण वाढवण्यासाठी हे पदार्थ जरी उपयोगी असले तरी ते मर्यादित प्रमाणात खावेत.
फूल चार्जवर 5 दिवसांचा बॅकअप, 86 टक्के स्वस्त मिळतेय हे स्मार्टवॉच