11 नोव्हेंबर 2026
Created By: Bhakti Gothankar
स्वयंपाक करणे आपण स्वयंपाक करताना नेहमी पदार्थांसाठी कांदा चिरतो. कांदा चिरायला घेतल्यावर आपल्या डोळ्यातून पाणी येऊ लागते तसेच डोळ्यांची मोठ्या प्रमाणात जळजळ होते, यामागे काही कारणे आहेत, चला जाणून घेऊयात
कांदा कापताना डोळ्यात पाणी येणे जेव्हा तुम्ही कांदा कापताना कांद्यातील पेशी फुटतात आणि अमिनो अॅसिड सल्फॉक्साईड आणि अॅलिनेसेस नावाचे एन्झाइम सोडतात. हे पदार्थ मिसळून syn- propanethial - oxide हा वायू तयार होतो.
म्हणून डोळ्यातून पाणी येते हा वायू डोळ्यांतील पाण्याशी मिसळून एक सौम्य आम्ल तयार करतो. हे आम्ल धुवून टाकण्यासाठी तुमचे डोळे अधिक प्रमाणात अश्रूंची निर्मिती करतात. त्यामुळे डोळ्याची जळजळ होते.
धारदार जाड पात्याचा चाकू स्वच्छ, धारदार पात्यामुळे पेशी चिरडल्या जातात, मोठ्या प्रमाणात वाफ बाहेर पडण्याऐवजी त्या सहजपणे कापल्या जातात.
टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा