अंघोळीसाठी तिळाचं तेल वापरण्याचे फायदे माहीत आहेत का ?

11 November 2023

Created By : Manasi Mande

दिवाळीचा सण देशभरात उत्साहाने साजरा केला जातो. देशभरात दिवाळी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. 

काही ठिकाणी दिवाळीच्या दिवशी पाण्यात तिळाचं तेल मिसळून अंघोळ करतात.

तिळाच्या तेलाने अंघोळ करणं शरीरासाठी आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं.

तिळाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ई, बी कॉम्प्लेक्स, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, प्रोटीन हे घटक असतात. 

तिळाच्या तेलाने अंघोळ करणे शरीरासाठी उपयुक्त ठरते.

त्यामुळे शरीरातील उष्णता वाढते आणि इम्युनिटीही बूस्ट होते.

तिळाच्या तेलाचा त्वचेलाही फायदा होतो.  कोरडी आणि निर्जीव त्वचा पुन्हा मऊ होते. स्किन सॉफ्ट आणि चमकदार दिसू लागते.

हिवाळ्यात केसांच्या समस्याही वाढतात. अशा वेळी तिळाच्या तेलाचा वापर केल्यास कोंडा कमी होतो, तसेच स्काल्पचा कोरडेपणाी नाहीसा होतो.

सकाळी उठल्यावर ‘या’ चुका बिलकूल करू नका