सर्वात अशिक्षित असे 10 देश कोणते? भारताच्या शेजारील देशाचाही  समावेश

Created By: Atul Kamble

 29 january 2026

दक्षिण सुदान - हा देश जगातील सर्वात तरुण देश आहे. येथील युद्धामुळे शाळा उद्धवस्थ झाल्या आहेत. जागतिक बँकेच्या मते येथील २७ टक्के जनता साक्षर आहे

चाड - आफ्रीकी देश चाडमध्ये गरीबी प्रचंड आहे. बहुतांशी लोक गावात रहातात.येथे शाळा नाहीत.त्यामुळे अनेक लोक निरक्षर आहे. येथे ३१ टक्के लोकच साक्षर आहेत.

 माली - मालीत गरीबीच्या सोबत दहशतवाद पसरलेला आहे.त्यामुळे शाळांना टाळे लागले आहेत. येथे केवळ ३५ लोक साक्षर आहेत.

नायझर - या देशाची लोकसंख्या वाढत आहे. परंतू लोक निरक्षर आहेत. येथे शाळा-शिक्षक नाही. येथे केवळ ३६ टक्के जनता साक्षर आहे.

अफगाणिस्तानातही युद्धाने पोळलेला देश असून मुलींना शिक्षण मिळत नाही.महिलांचे शिक्षण रोखल्याने येथे साक्षरता दर ३७ टक्के आहे.

गिनी - आफ्रीकन गिनी देश खनिज संपत्ती असली तरी शिक्षणाच्या सुविधा नाहीत. येथील केवळ ४० टक्के लोकसंख्या साक्षर आहे.

बुर्किना फासो - साहेल क्षेत्रातील अन्य देशांप्रमाणे बुर्कीना फासो सुरक्षितता नसल्याने साक्षर नाही. येथे शिक्षकच नसल्याने या देशाची साक्षरता केवळ ४१ टक्के आहे.

मध्य आफ्रीकी गणराज्य - येथील सरकार पायभूत सुविधा नसल्याने शिक्षण देऊ शकत नाही.यादवीने येथे सर्वकाही नष्ट केल्याने केवळ ४२ टक्के लोक साक्षर आहेत.

 पाकिस्तान - येथे शहरी लोकसंख्या साक्षर आहे. परंतू महिलांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी आहे.येथे साक्षरचे रेट ५९ टक्के आहे.

 इथिओपिया - गेल्या एक दशकात या देशाने शिक्षण व्यवस्था सुधारली. १२ कोटीहून अधिक लोकसंख्या आणि ग्रामीण क्षेत्रामुळे येथे ६० टक्के लोकच साक्षर आहेत.