विना विरजणाचे डेअरीसारखे घट्ट दही तयार करण्याचे 5 बेस्ट उपाय

Created By: Atul Kamble

 17 FEB 2026

दही एक प्रोबायोटिक फूड आहे. गट हेल्थसाठी दही उत्तम आहे. दह्यात प्रोटीन असते. कॅल्शियम, विटामिन डी असल्याने हाडे मजबूत होतात.

पॅकेटवाले दही आणण्या ऐवजी घरातले दही आरोग्यासाठी बेस्ट असते. पाच प्रकारे विरजणाचे दही कसे बनवायचे ते पाहूयात.

विरजण नसेल तर चार ते पाच हिरव्या मिरच्याचे तुकडे टाकून दूध ढवळावे आणि झाकण ठेवून सेट होण्यासाठी ठेवावे

चांदीचे नाणे असेल तरी दूधात चांदीचे नाणे टाकून ठेवले तरी दही तयार होते. 

उकळून कोमट केलेल्या दूधात लिंबाचा रस टाकला तरी दही जमते.

विरजण नसेल तर सॅट्रीक एसिडचा वापर करुन दही तयार करता येते.परंतू अत्यंत कमी प्रमाणात ते दूधात टाकावे

 हिरव्या मिरची प्रमाणेच सुखलेली लाल मिर्ची दही जमवू शकते. देठासह तीन ते चार लाल मिरच्या दूधात टाकून चमच्याने हलवावे आणि झाकण ठेवून दही बनण्यास ठेवून द्यावे