25 नोव्हेंबर 2026
created by : atul kamble
या आठवड्यात रात्री आकाशाकडे पाहण्यासाठी एक खास कारण तुम्हाला मिळणार आहे.
आपल्या पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह चंद्र नोव्हेंबरच्या पौर्णिमेत आणखीनच मनमोहक दिसतो.
सलग तीन दिवस आकाशात चंद्राचे हे अनोखं रूप पाहाता येत आहे.यातील सोमवार, मंगळवार संपला आहे.
नोव्हेंबरच्या पौर्णिमेचा सुपरमून तुम्हाला खास खिळवून ठेवणारा आहे.
चंद्राचे तेजस्वी आणि मनमोहक रूप सध्या आकाशात पाहायला मिळत आहे.चंद्र जरा पृथ्वीच्या जवळ आलाय..
आज बुधवारच्या संध्याकाळीही चंद्र पूर्ण गोलाकार आणि तेजस्वी दिसणार आहे.
नोव्हेंबरमधील या पौर्णिमेला 'बीव्हर मून' (Beaver Moon) म्हणतात.
अमेरिकेत हिवाळ्याची तयारीसाठी धरणं बांधणारे बीव्हर हे छोटे प्राणी या काळात विशेष सक्रिय असतात. त्यावरून या पौर्णिमेला हे नाव पडलंय