तांदळाच्या आकाराचा डीव्हाईस, करेल हदयाचा आजार बरा
Created By: Atul Kamble
8 january 2026
संशोधकांनी तांदळाच्या दाण्याच्या आकाराचा जगातला सर्वात छोटा पेसमेकर विकसित केला आहे.
हा पेसमेकर त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आपोआप शरीरात सुरक्षित पणे विरघळून जाणार आहे.
पारंपारिक पेसमेकरच्या विरुद्ध या पेसमेकरला शरीरातून बाहेर काढण्यासाठी पुन्हा सर्जरीची गरज लागत नाही.
हृदयाचा धक्का किंवा सर्जरीनंतर रुग्णाच्या हार्ट रिदमला हा नियंत्रित करण्यास मदत करतो.
दुसऱ्यांदा सर्जरी करावी न लागल्याने रुग्णांना इन्फेक्शन आणि इन्फ्लेमेंशनची धोका कमी होईल.
हे तंत्रज्ञान रुग्णांना लवकर बरे होण्यास आणि एकूण खर्च कमी होण्यास मदत करेल.
वैद्यकीय क्षेत्रातील हे तंत्रज्ञान शरीरासोबत काम करते आणि नंतर स्वत:हून विरघळून जाते.
नारळपाणी प्यायल्याने किडनी स्वच्छ व्हायला २० ते ४० मिनिटे लागतात.