06 August 2025
Created By: Atul Kamble
चाणक्य नितीतील अनेक गोष्टी आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी मदतगार ठरतात
चाणक्य नितीत एक श्लोक आहे, आतुरे व्यसने प्राप्ते दुर्भिक्षे शत्रू-संकटे | राजद्वारे श्मशाने च यस्तिष्ठति स बान्धव:||
रोगाने पीडित झाल्यावर,दु:ख झाल्यावर,दुष्काळ पडल्यावर,शत्रूसंकट आल्यावर,मृत्यू आल्यावर,जी व्यक्ती साथ सोडत नसेल ती सच्चा मित्र असते
कुटुंबातील सदस्य,बाहेरुन जीवनात आलेला दोस्त,जो या स्थितीत तुमच्या सोबत असेल तोच तुमचा खरा मित्र
आजार झाल्यावर,दु:ख झाल्यावर, शत्रूंचे संकट आल्यावर,मृत्यूआल्यावर,या स्थितीत मदतीची गरज असते
अशा स्थितीत ज्याचा साथ मिळेल तो बस आपला हितचिंतक आहे हे समजून जावा
याशिवाय तुम्ही केवळ मदतीची अपेक्षा करुन पुरेसे नाही, तुम्ही देखील अशा परिस्थितीत दुसऱ्याची मदत करावी
चाणक्य यांच्या मते जो दुसऱ्यांना मदत करतो त्यालाच मदत मिळते, जो कोणाच्या कामी येत नाही त्यास कोणीच मदत करत नाही