कॉफी पिण्याशिवाय या कामासाठी देखील उपयोगात येते 

Created By: Atul Kamble

27 March 2026

 जर आळस आला असेल तर अनेकजण एक कॉफी होऊन जाऊ दे असे म्हणत असतो. पण पिण्याशिवाय अनेक कामात कॉफी वापरली जाते.

कॉफी केसांना रंग लावण्यासाठी देखील वापरली जाते. मेंहदीत कॉफी टाकून केसांना कलर चांगला येतो. तसेच कॉफीच्या पाण्याने केस धुता देखील येतात.

फ्रीजमध्ये विचित्र वास येत असेल दोन छोट्या वाट्यात कॉफी पावडर टाकून या वाट्या फ्रिजमध्ये ठेवून दार बंद करा. किमान २४ तास ठेवल्याने दुर्गंध दूर होतो.

जर मशिनने कॉफी बनवत असेल तर उरलेली कॉफी फेकण्याऐवजी झाडांच्या कुंड्यात टाकावी. त्याने किटक दूर राहातील, मातीची गुणवत्ता वाढेल.

 ग्लुमध्ये कॉफी पावडर मिक्स करुन फर्निचरला जर चिरा किंवा फटी पडल्या असतील तर त्या बुजवता येतात. त्यानंतर पॉलिश पेपरने घासावे. नंतर नारळ तेल लावावे.

 नारळ तेल आणि एलोवेरा जेल सोबत कॉफी चेहऱ्याला लावल्याने टॅनिंग, डेट स्कीन आणि डाग निघून जातात.

मुंग्या झाल्या असतील तर त्या जागी कॉफी पावडर टाका मुंग्या दूर पळतील.