मुस्लीम धर्माव्यतिरिक्त आणखी कोणत्या धर्मात असते खतना परंपरा ?

28 June 2025

Created By: Atul Kamble

 खतना ज्याला सुन्नत किंवा सुंता वा खितान देखील म्हटले जाते.

मुस्लीम समुदायात खतना हा एक धार्मिक संस्कार म्हणून पाहीला जातो

ही एक अशी प्रथा आहे जी पैगंबर मोहम्मद यांच्या शिक्षण आणि प्रथेचे पालन म्हणून केली जाते

याकडे मुस्लीम समुदायातील स्वच्छता आणि शुद्धीकरण म्हणून पाहीले जाते.

मुस्लीम समाजाव्यतिरिक्त कोणत्या धर्मात खतना केला जातो हे पाहूयात

खतनाची परंपरा मुस्लीमांशिवाय ज्यु धर्मातील लोकही पाळतात

ज्यु धर्मात खतना परंपरेला Brit Milah देखील म्हटले जाते.

खतना ज्यु धर्मात देखील एक महत्वाचा धार्मिक संस्कार मानला जातो

ज्यु धर्मात नवजात बालकाच्या जन्मानंतर आठव्या दिवशी खतना संस्कार केला जातो