हिरवा बटाटा आरोग्यासाठी खरंच खतरनाक असतो ?

7 June 2025

Created By: Atul Kamble

हिरव्या बटाट्यांनाही काही लोक विषारी मानतात? आरोग्यासाठी तो चांगला नसतो असे म्हटले जाते. 

बटाटाच्या जो भाग शेतात जमीनीच्या बाहेर राहातो तो भाग हिरवा होतो.हा बटाटा खाल्ल्याने काही वेळा नुकसान होते.

अमेरिकन संशोधक मॅरी मॅकमिलन आणि जेसी थॉम्पसन यांनी सांगितले की हिरवा बटाटा नेहमीच विषारी नसतो.

 लंडनमध्ये १९७९ मध्ये लंडनमध्ये हिरवा बटाटा खाल्ल्याने ७८ मुले आजारी पडली होती. त्यांना उल्टी-जुलाब झाले होते

हिरवा बटाट्यात सोलानाईन नावाचा विषारी पदार्थ तयार होतो. तो ग्लाईकोअल्कलॉईडेस विषारी तत्वात तो मोडतो.

बटाट्यांना ओलसर दमट जागेत ठेवले की त्याला मोड येतात. खूपच हिरवे आणि मोड आलेले बटाटे शरीरासाठी चांगले नाहीत

बटाट्याचा हिरवा रंगाचा भाग नीट कापावा,अंकुर आलेले बटाटे खाऊ नये. लहान मुलं, ज्येष्ठ नागरिकांना हिरवे बटाटे खाऊ नयेत