सिंगापूरमध्ये भारतीय मसाल्यांवर बंदी आहे का?

10 जून 2025

Created By:  राकेश ठाकुर

सोशल मीडियावर काही पोस्टच्या माध्यमातून भारतीय मसल्यांवर सिंगापूरमध्ये बॅन असल्याचा दावा केला जातो. या मागचं काय सत्य आहे ते जाणून घ्या. 

भारतीय मसल्यात एथिलीन ऑक्साइड आणि कँसर वाढवणारे केमिकल असतात. त्यामुळे सिंगापूरमध्ये  बॅन असल्याचा दावा केला जातो.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टवर सरकारने स्पष्टीकरण दिलं होतं. मसाल्याच्या काही बॅचमध्ये हा संभ्रम निर्माण झाला होता. 

भारतातून सिंगापूरमध्ये पाठवलेल्या मसाल्यांच्या काही बॅचमध्ये एथिलीन ऑक्साइडचं प्रमाण तिथल्या मानकापेक्षा अधिक आढळलं होते. त्यामुळे मसाले परत मागवले गेले. 

या प्रकरणी कॉमर्स मिनिस्ट्री आणि मसाला बोर्डने काही पावलं उचलली आहेत. मसाले एक्सपोर्ट करण्यापूर्वी टेस्टिंग करणं अनिवार्य केलं आहे. 

एक्सपोर्ट करण्यापूर्वी गाइडलाईनचं पालन केलं जावं. यात कोणतीही भेसळ नसावी आणि ठरलेल्या मानकांचं उल्लंघन नसावं.

तपासाची जबाबदारी फूड सेफ्टी अँड स्टँडर्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) कडे आहे. 

दुधात मनुके भिजवून खाणं महिलांसाठी आरोग्यवर्धक, का ते जाणून घ्या