15 August 2025

Created By: Atul Kamble

परफ्युम लावूनही शरीराचा दुर्गंध जात नाही, तुरटी येईल कामी

28 August 2025

Created By: Atul Kamble

घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी लोक परफ्युम वापरतात.परंतू तरी दुर्गंधी काही जात नाही

अशा वेळी तुरटीच्या मदतीने नैसर्गिकरित्या घामाची  दुर्गंधी जाऊ शकते

तुरटीत नैसर्गिकदृष्ट्या एंटी बॅक्टेरियल गुण असतात, जे शरीरातील दुर्गंधी नष्ट करण्यास मदत करतात

 तुरटी रासायनिक परफ्युम आणि डीओड्रंटचे नैसर्गिक पर्याय आहे. जो कोणत्याही साईड इफेक्टशिवाय ही समस्या दूर करतो

घामाचा दुर्गंध जाण्यासाठी आंघोळीनंतर तुरटीच्या दगडाला ओले करुन अंडरआर्म्सला काही वेळ चोळावे

याशिवाय तुरटीचा हा छोटा तुकडा पाण्यात विरघळवून त्याचा नैसर्गिक बॉडी स्प्रे सारखा वापर करु शकतो

 यास बाटलीत भरुन आपल्या बॅगेत बाळगू शकता. तुरटीचे एंटीसेप्टीक गुण घामाची दुर्गंधी अनेक तास रोखण्यास प्रभावी ठरु शकतात

तुरटीने त्वचा मुलायम रहाते. तुरटीचा वापर आपण नियमित करु शकता