नियमित व्यायाम केल्यामुळे अनेक रोग टाळता येतात. उतारवयातही शरीर निरोगी ठेवता येते. 

8 June 2025

व्यायाम केल्यानंतर ह्रदयाचे ठोके, रक्तदाब, मेटाबॉलिज्म वाढलेले असते. त्यामुळे व्यायाम केल्यानंतर लगेच ब्लड टेस्ट करु शकतो की नाही, जाणून घ्या. 

दिल्लीतील डॉ. सुभाष गिरी म्हणतात, व्यायामामुळे शरीरात अनेक बदल होतात. त्यामुळे लगेच ब्लड टेस्ट करु नये. योग्य निष्कर्षासाठी काही वेळाने टेस्ट करावी.

वर्कआउटनंतर शरीर डिहायड्रेट होते. त्यामुळे ब्लड व्हॉलूम कमी होते. परिणामी ब्लड टेस्टचा रिजल्ट प्रभावी होऊ शकतो. 

वर्कआउटपूर्वी काही खाल्ले असेल तरी ब्लड शुगर आणि लिपिड प्रोफाइलमध्ये बदल होतो.

व्यायामानंतर लगेच शुगर लेव्हल, कोलेस्ट्रॉल, हॉर्मोन, लॅक्टेट आणि क्रियटिनिन या चाचण्याही करु नये. 

ब्लड टेस्ट एक्सरसाइजनंतर कमीत कमी 1 ते 2 तासांनी केली पाहिजे. काही चाचण्यापूर्वी 8 ते12 तासांचा फास्टिंग पीरियड गरजेचा आहे.

सामान्य हेल्थ चेकअपसाठी सकाळची वेळ योग्य असते. टेस्ट नेहमी रिकाम्या पोटी आणि व्यायाम न करता केली पाहिजे.