उन्हाळ्याची चाहूल लागतात बाजारात आलेले लाल लाल कलिंगड खवय्यांना आकर्षित करत असतात. 

9 March 2025

कलिंगडमध्ये पोटॅशियम, जीवनसत्त्वे ए आणि सी, फायबर, लाइकोपीन, अँटीऑक्सिडंट्स, पाणी असते. त्यामुळे ते आरोग्यासाठी चांगले असते.

शुगर (मधुमेह) असलेल्या लोकांनी कलिंगड खावे की नये? यासंदर्भात त्यांचा गोंधळ असतो. 

कलिंगडमध्ये पाणी मुबलक प्रमाणात असते. 120 ग्रॅम कलिंगडमध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स जवळपास पाच असतो.

यामुळे कलिंगडमुळे शुगर वाढत नाही. ताजे कलिंगड शुगर असलेले रुग्ण खावू शकतात. 

कलिंगडचे ज्यूस मात्र शुगर असलेल्या रुग्णांसाठी चांगले नसल्याचे सांगितले जाते. कारण ज्यूसचा ग्लाइसेमिक इंडेक्स जास्त असते. 

शुगर असलेल्या रुग्णांची रक्तातील साखर नियंत्रणात असेल तेव्हाच त्यांनी कलिंगड खावे. शुगर नियंत्रणात नसलेल्या रुग्णांनी कलिंगड खाणे टाळावे. 

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)