चाणक्य निती - मनुष्य असूनही पशुसमान असतात असे लोक

1 December 2025

Created By: Atul Kamble

चाणक्य नितीनुसार दोन पायाच्या मनुष्यात हे दुर्गुण असतील तर तो पशूपेक्षाही वाईट आहे

 चाणक्य नितीनुसार शिक्षणाशिवाय मनुष्य अंधारात चालणारा पशू आहे. न विचार करु शकतो, न निर्णय घेऊ शकतो. शिक्षणच माणसाला मनुष्य बनवते.

जो कमजोर, गरीब,आजारी व्यक्तीवर दया दाखवत नाही. तो व्यक्ती लांडग्याहून गया गुजरा आहे.

 जो कमावतो पण गरजूंना दान करत नाही. तो असा गाढव आहे जो वजन वाहतो, पण स्वत:साठी जगत नाही.

जो पूजा करत नाही, सत्य बोलत नाही,चांगले कर्म करत नाही तो मनुष्याच्या शरीरात भटकते प्रेत आहे. धर्मच माणसाला तारतो असे चाणक्य म्हणतात.

दारु पिऊन जो आपला विवेक गमावत,तो डुकरापेक्षाही खाली घसरतो.ना कुटुंब रहाते, ना सन्मान, ना पैसा..

विना शिक्षण,दया, दान, धर्म, मद्यात बुडालेला व्यक्ती - हे वाईट गुण पशुच्या समान आहेत. असा व्यक्ती जीवंत असतानाच मेलेला असतो.

मद्य, दयेचा अभाव, दान न करणे, धर्मापासून दूर - चाणक्याच्या नजरेत ही सर्व पशु बनण्याची सुरुवात आहेत.

आचार्य चाणक्य यांच्यामते या 5 दुर्गुणांपासून जो वाचतो. तोच खरा मनुष्य बनत असतो. त्यालाच धन, सन्मान आणि स्वर्ग मिळतो.