थंडीत हार्ट अटॅकचा धोका का वाढत असतो ?

30 November 2025

Created By: Atul Kamble

 तापमानातील बदल तुमच्या आरोग्यावर खास करुन हृदयावर गंभीर परिणाम करत असतो.

तज्ज्ञांच्या मते थंडीत ब्लड वेसल्स आकुंचन पावतात. त्यामुळे स्ट्रोक आणि हृदयाचा झटका येण्याची शक्यता वाढते

बाहेर थंडी असल्याने शरीराचे तापमान सामान्य ठेवण्यासाठी हृदय जास्त मेहनत घेत असते.

वाढत्या ब्लड प्रेशरने कोरोनरी धमन्या अरुंद होतात. त्यामुळे हृदय आणि स्नायूंपर्यंत पोहचणारे रक्त आणि ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. त्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

वजन वाढणे आणि कमी शारीरिक व्यायाम या दोन्हीमुळे हृदयावर ताण येऊन हार्ट अटॅक येऊ शकतो.

 हृदयाचे आरोग्य चांगले रहाण्यासाठी तळलेले पदार्थ, फॅटी, शुगरी वा हाय कोलेस्ट्रॉलचे पदार्थ टाळणेच उत्तम आहे.

शरीरात उब देण्यासाठी थंडीत उबदार कपडे परिधान करावेत, अधिक सक्रीय रहावे.

नियमित व्यायाम फिट रहाण्यासाठी मदत करतो आणि शरीरास गरम राखतो.धुम्रपान बंद करावे.

 ( डिस्क्लेमर - ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी हेल्थ एक्सपर्टचा सल्ला घ्या )