चाणक्य निती : या 4 चुकीच्या सवयींमुळे मनुष्य स्वत:चाच शत्रू होतो..

9 DEC 2025

आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी आजही लागू आहेत.

आचार्य चाणक्य यांच्या मते सर्वात मोठा शत्रू माणसाच्या आतच असतो.काही सवयी तुम्हाला स्वत:चा शत्रू बनवतात

 चाणक्य यांच्या मते रागात घेतलेला निर्णय नेहमीच चुकीचा असतो. रागात चांगले वाईट समजत नाही.नंतर पछतावा होतो

चाणक्याच्या मते डोळे झाकून विश्वास ठेवण्याने कोणीही पाठीत खंजीर खूपसू शकतो.अंधभक्ती आणि अतिविश्वास सर्वात मोठे नुकसान करतो

चाणक्य नितीनुसार तुमच्या कमजोरी कोणाला सांगू नये.जे लोक तुमची कमजोरी जाणतात. उद्या तुमच्या विरोधात त्याचा हत्यार म्हणून वापर होऊ शकतो.

आचार्य चाणक्य म्हणतात योग्य वेळी योग्य पाऊल न उचलल्यास आयुष्यभर पश्चाताप होतो.एकदा संधी हातून गेली की परत मिळत नाही.

 राग,अंधविश्वास,कमजोरी सांगणे आणि संधी गमावणे हे 4 गुण माणसाचे  स्वत:चे मोठे शत्रू आहेत.

रागात नोकरी सोडणे,चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवणे,स्वत:ची कमजोरी इतरांना सांगणे, आणि योग्य संधींना टाळणे या आजही सर्वात मोठ्या चुका आहेत.

चाणक्य नितीनुसार रागात शांत रहा,भरवसा ठेवताना जागरुक राहा,कमजोरी लपवा आणि संधी मिळताच निर्णय घ्या. या 4 बाबींनी जीवन स्वर्ग बनेल.