शरीरात ही लक्षणे दिसली तर हलक्यात घेऊ नका, मोठ्या समस्येची ठरु शकते नांदी

9 DEC 2025

 आपल्या शरीरात काही समस्या सुरु होण्याआधी शरीर काही संकेत देत असते. ते ओळखणे गरजेचे असते.

त्वचेवर पांढरे डाग असतील तर शरीरात विटामिन्स बी-12 ची कमरता किंवा कोणत्यातरी ऑटोइम्युन समस्येचा संकेत असू शकतो

 रात्री पायात जळजळ किंवा सुन्नपणा होत असेल तर डायबिटीज किंवा इतर आजाराचा धोका असू शकतो

 तोंडातून सतत दुर्गंधी येत असेल तर तुमच्या गट हेल्थमध्ये बिघाड असू शकतो. अपचन, एसिड रिफ्लक्स वा लिव्हरशी संबंधीत समस्या असू शकते.

हातपाय थंड राहणे हे खराब ब्लड सर्क्युलेशन व थायरॉईड ग्लँडची समस्या असू शकते.ब्लड सर्क्युलेशन नीट होत नसल्यास हातापायात रक्ताचा प्रवाह पोहचत नाही.

 जर तुम्हाला खारट पदार्थ खाण्याची इच्छा होत असेल हे मिनरल लॉस वा एड्रनल फटींगचे लक्षण असू शकते.

 पापण्या फडफडणे हे मॅग्नेशियमची कमतरता किंवा झोप पूर्ण न होण्याचे किंवा नर्व्हस सिस्टीममध्ये स्ट्रेसचे लक्षण आहे.

 अचानक पिंपल्स येणे हे पॉलिसिस्टीक ओव्हरी सिंड्रोम, इंसुलिनची पातळी वाढणे किंवा जास्त तणावाचे लक्षण असू शकते.

अनियमित शौचाला येणे हे गट हेल्थ बिघडणे वा लिव्हरचे फंक्शन खराब होणे याकडे इशारा करतात.स्वत:ची पचन यंत्रणा चांगली ठेवणे गरजेचे असते.

कान वाजणे, कानात सत घंटी किंवा शिट्टीसारखा आवाज होणे हे तणाव, नर्व्हमध्ये सूज वा बिटामिन्स बी-12 ची कमतरता असू शकते.