28 November 2025
Created By: Atul Kamble
आचार्य चाणक्य यांच्या मते या 5 गोष्टी मनुष्याच्या हातात नसतात. मग तुम्ही कितीही मेहनत करा.काही गोष्टी गेल्या जन्माचे कर्म आणि भाग्याने मिळतात. कोणत्या त्या गोष्टी पाहूयात..
मनुष्य किती जगणार हे आधीच निश्चित होते. चाणक्य म्हणतात आयुष्य हे कर्माने नव्हे गेल्या जन्मातील प्रारब्धाने निश्चित होते. मेहनत आरोग्य सुधारु शकते. पण वय वाढवू शकत नाही.
किती धन मिळेल, हे देखील भाग्याचा खेळ आहे. चाणक्य नितीनुसार, मेहनतीने धन कमवता येऊ शकते.पण,जेवढे लिहिले आहे त्यापेक्षा एक कवडीही जास्त मिळत नाही.
शिक्षण( ज्ञान) - पुस्तके वाचल्याने डिग्री मिळते. परंतू असली बुद्धी आणि समज गेल्या जन्माच्या संस्कारांनी येते. चाणक्य यांच्या मते शिक्षण भाग्याने उजळते. मेहनत केवळ सहाय्य करते.
कर्म ( काम-धंदा) - कोणत्या क्षेत्रात यश मिळेल तेही ठरलेले असते.चाणक्यांच्या मते व्यक्ती ज्या कामात भाग्यशाली असतो. तेच काम आपोआप चमकते.इतर सर्व फिके पडते.
केव्हा,कुठे आणि कसे मरण येणार हे संपूर्णपणे नशीबावर अवलंबून असते. चाणक्य यांच्यामते मृत्यूला मेहनत टाळू शकत नाही, ना औषध.जेव्हा वेळ येते तेव्हा सर्व संपते.
चाणक्य यांच्या मते या 5 गोष्टी भाग्याने मिळतात.परंतू मेहनतीने यास चांगले बनवता येऊ शकते. मेहनत केली नाही तर भाग्यात जे आहे तेही निघून जाते.
दोन भाऊ एकसारखी मेहनत करतात. एक करोडपती बनतो. दुसरा संघर्ष करत रहातो. कारण, धन-कर्म-विद्या नशीबाने निश्चित होते. मेहनत केवळ रस्ता दाखवू शकते.
भाग्याला जागवण्यासाठी मेहनत करा, बिना मेहनत भाग्यही झोपलेले असते. चांगले कर्म करा, गेल्या जन्माचे भाग्य आपोआप चमकते.