26 september 2025
Created By: Atul Kamble
लिव्हर, किडनी आणि डोळ्यांसारखे हृदयाची हेल्थ देखील गरजेची असते. हृदयाची काळजी घेण्यासाठी लोक अनेक उपाय करत असतात
हृदयाच्या आरोग्यासाठी सप्लीमेंट्स पासून व्यायामापर्यंत लोक आपल्या सवयी बदलत असतात
परंतू छोट्या-छोट्या गोष्टी देखील तुमच्या हृदयाची काळजी घेण्यासाठी पुरेशा असतात. यात एक आहे योग्यवेळी हार्ट फ्रेंडली फूड्स खाणे
केळ खाणे हे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूपच लाभदायक मानले जाते. परंतू ते योग्यवेळी खाल्ल्याने हार्ट अटॅकपासून बचाव होऊ शकतो
पण ही योग्य वेळ कोणती ? ब्रिटीश हार्ट फाऊंडेशनच्या मते सकाळी ११ वाजता एक केळ खाणे तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारू शकते
हा छोटीशी गोष्ट तुम्हाला लवकर एनर्जी देते. हृदयाला मजबूत आणि हेल्दी राखण्यास मदत करते.केळ कसे फायद्याचे पाहूयात
सकाळी ११ वाजता केळ खाण्याची योग्य वेळ असते.केळातील नैसर्गिक गोडपणा,फायबर हळूहळू एनर्जी देतात.दुपारच्या जेवणापर्यंत तुम्ही साखर न खाता एक्टीव्ह राहाता
केळ्यात पॉटेशियम असल्याने ते मीठाची पातळी नियंत्रित करते.ब्लड वेसल्सना आराम देते.ब्लड प्रेशर नियंत्रित करते.त्यामुळे स्ट्रोकचा धोका कमी होतो
केळ हृदयाची काळजी घेतेच पण कोलेस्ट्रॉलही कमी करते.एनर्जी वाढवते वजन नियंत्रित करते