पाहा ही 6 अध्यात्मिक ठिकाणं, जेथे मनाला शांती आणि नवी ऊर्जा मिळते...

16 June 2025

Created By: Atul Kamble

भारत अध्यात्मिक शांतीसाठी ओळखला जातो.जर स्वत:शी संवाद साधायचा असेल तर अशी 6 ठिकाणं पाहूयात

 बनारस - येथे सायंकाळी होणारी गंगा आरती आणि जीवन मृत्यूच्या चक्राला अनुभवणे एक अलौकिक अनुभव आहे

 ऋृषीकेश- उत्तराखंड येथे योगची सुरुवात झाली होती.येथे आश्रमात किंवा गंगा किनारी ध्यान केल्याने शांती लाभते

बोधगया- बिहार येथे गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती.महाबोधी मंदिर,बोधीवृक्षाखाली ध्यान करण्याचा अनुभव आगळा आहे.

अमृतसर -पंजाब येथील सुवर्ण मंदिरात शांत तलाव आणि ग्रंथ साहिबचे दर्शनाने मन शांत होते. येथील लंगर सेवाव्रत आणि शिख परंपरा दाखवतो

तिरुवन्नामलाई - तामिळनाडू येथील अरुणाचल डोंगर आणि रामणाश्रम तसेच गिरीवलम पर्वताची परिक्रमा एक वेगळी अनुभूती देते

केदारनाथ - हिमालयातील केदारनाथची पायवाट अवघड आहे. परंतू येथे पोहचल्यानंतर मनाला शांती मिळते.