Created By: Atul Kamble

20 April 2026  

किचनमध्ये झुरळांनी मांडलाय उच्छाद, हे घरगुती उपाय येतील कामी 

Created By: Atul Kamble

किचनमध्ये झुरळं होणं ही सर्वसामान्य बाब आहे. मात्र,त्यामुळे आरोग्य धोक्यात येऊ शकते.

स्वयंपाक घर रोज स्वच्छ ठेवा, खासकरुन सिंक, गॅस शेगडी आणि कोपऱ्यातील जागा स्वच्छ ठेवा

उघड्यावर अन्नपदार्थ ठेवू नका, त्याने झुरळं आकर्षित होतात. एअरटाईट कंटेनरमध्ये पदार्थ ठेवा.

बेकींग सोडा आणि साखर मिक्स करुन कोपऱ्यात ठेवा, त्याने झुरळं नष्ट होतील.

 तमालपत्र किचनच्या कोपऱ्यात ठेवा, त्याच्या वासाने झुरळं येत नाहीत.

लिंबू आणि व्हिनेगर किचन कट्टा स्वच्छ केल्यास येथे झुरळांचा वावर बंद होईल, किचनही फ्रेश होईल

सिंक वा पाईपमध्ये पाणी जमा होऊ न देणे, कारण ओलाव्याच्या ठिकाणी झुरळांची वाढ होते.

डस्टबिन रोज स्वच्छ करावा आणि झाकणाचा डस्टबिन वापरावा.