औषधावाचून जाईल खोकला , या देशी वस्तूंचे सेवन करा 

17 october 2025

Created By: Atul Kamble

ऑक्टोबर हीट सुरु झाली आहे. वातावरण बदलल्याने सर्दी -खोकल्याने त्रस्त असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

 खोकल्यावर कफसिरफ घेता येते.परंतू काही देशी उपायांनी आराम मिळतो. चला कोणते ते उपाय हे पाहू

जयपूरच्या आयुर्वेद तज्ज्ञ किरण गुप्ता यांच्या मते काळी मिरीची पावडर बनवून पाण्यासोबत घेतल्यास आराम मिळतो

जर पिंपळाच्या पानांना पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्यासही खोकला बरा होतो असे किरण गुप्ता सांगतात

ज्येष्ठमधाच्या काड्या चावल्याने वा त्या पाण्यात टाकून उकळून ते पाणी थंड करुन पिल्याने खोकला जातो.

आल्याचा चहा बनवून त्यास प्यावे, आल्यात एंटीऑक्सीडेंट तत्वं असल्याने खोकल्यात आराम मिळतो.

 गुळवेलमध्ये ग्लुकोसाईड, टीनोस्पोरिन, एंटीऑक्सीडेंट आणि एंटी-इंफ्लेमेटरी गुण असतात.गुळवेल उकळून पाणी प्यायल्यासही खोकल्यात आराम मिळतो.