फॅटी लिव्हर झाल्यास हे पदार्थ खाल्ल्यास मिळेल आराम

16 october 2025

Created By: Atul Kamble

 फॅटी लिव्हर आजच्या काळातील गंभीर समस्या बनली आहे.लोक विविध प्रकारचे उपाय करत आहेत.

 फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त चरबी जमते.ही चरबी लिव्हरच्या एकूण वजनाच्या 5-10 टक्के असते.त्यास फॅटी लिव्हर म्हणतात.

 या समस्येत आहारावर विशेष लक्ष ठेवावे लागते.फॅटी लिव्हरच्या समस्येत उपयोगी ठरणारे फूड्स कोणते ते पाहूयात

जर फॅटी लिव्हरची तक्रार असेल तर लसूणाचे सेवन करु शकता. त्यामुळे फॅट विरघळण्यास मदत होते.

रोज सकाळी रिकाम्या पोटी लसून खाल्ला तर लिव्हरची सूज कमी होऊ शकते. आणि फॅटी लिव्हरच्या समस्येत आराम मिळतो.

एव्होकाडो एक सुपरफ्रुट आहे.यात हेल्दी फॅट्स, फायबर आणि एंटीऑक्सीडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. 

यातील तत्वे लिव्हरमधील फॅटचे प्रमाण कमी करु शकतात आणि त्याचे आरोग्य चांगले करु शकतात

 ग्रीन टीत आढळणारे कॅटेचिन नावाचे एंटीऑक्सीडेंट्स फॅटी लिव्हरची समस्या कमी करण्यास मदत करु शकतात.

( डिस्क्लेमर - ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या )