घरी सिलेंडर डिलिव्हरी करणाऱ्याला किती रुपये मिळतात?

16 July 2025

Created By: Swati Vemul

तुमचं घर कोणत्याही मजल्यावर असलं तरी डिलिव्हरी एजंट 29.5 किलो वजनाचं सिलेंडर घेऊन येतो

या कामासाठी त्या व्यक्तीला किती रुपये मिळत असतील, असा कधी प्रश्न पडला का?

गॅस सिलेंडर डिलिव्हरी एजंट राजेंद्रने सांगितलं की त्यांना प्रत्येक सिलेंडरच्या हिशोबाने डिलिव्हरीचे पैसे मिळतात

त्यांचं एजन्सीशी कनेक्शन असतं आणि एक सिलेंडर सप्लाय करण्यासाठी 24 रुपये मिळतात

यामध्ये बाइकचं पेट्रोल किंवा इतर खर्च डिलिव्हरी एजंटचाच असतो.

एजन्सीला गॅस कंपनीकडून 73 रुपये मिळतात, त्यापैकी 24 रुपये ते डिलिव्हरी बॉयला देतात

सर्वसामान्यपणे एक व्यक्ती एका दिवसात 40 सिलेंडर डिलिव्हरी करते

गावच्या ठिकाणी अंतर जास्त असल्याने 10 रुपये जास्त म्हणजेच 35 रुपये मिळतात

प्रत्येक शहरानुसारही डिलिव्हरी एजंटला मिळणारे पैसे वेगवेगळे असू शकतात

तू शर्टलेस दिसता कामा नये..; आर. माधवनची मुलाला सक्त ताकीद