Created By: Atul Kamble

02 May 2026

साप अंडी देतात की पिल्लं ?  सत्य जाणून धक्का बसेल

अनेकदा लोकांच्या मनात प्रश्न येतो की साप अंडी देतात की थेट पिल्लांना जन्म देतात.

 अनेकांना वाटते की सांप केवळ अंडी देतात, परंतू सत्य थोडे वेगळे आणि रंजक आहे.

वास्तविक साप दोन प्रकारे पिल्लं देतात. काही साप अंडी देतात.तर काही थेट पिल्लांना जन्म देतात.

जे साप अंडी देतात त्यांना ओविपेरस म्हणतात. हे साप सुरक्षित जागी अंडी देतात. काही काळांनी अंड्यातून पिल्ले येतात.

काही सांप अंडी देत नाहीत. ते छोट्या-छोट्या पिल्लांना जन्म देतात. 

यांना विविपेरस म्हटले जाते. अशा सापात पिल्ले शरीरात विकसित होतात आणि नंतर जन्म घेतात.

काही साप असतात जे मध्यम मार्ग अनुसरतात. ते अंडी तयार करतात आणि त्यांना शरीराच्या आतच ठेवतात. आणि तेथूनच पिल्ले बाहेर पडातात. त्यांना ओवोविविपेरस म्हटले जाते.

याचा अर्थ प्रत्येक साप एकसारखा नसतो. काहींची मादी अंडी देते तर काही पिल्लांना जन्म देते. हे त्यांच्या प्रजाती आणि त्याच्या वातावरणावर अवलंबून असते.