ब्रेड संदर्भातील या 10 रंजक बाबी माहिती आहेत काय ?
09 July 2025
Created By: Atul Kamble
ब्रेड सर्वात जुना प्रोसेस्ड फूड आहे. ज्याचा इतिहास सुमारे 14 हजार वर्षे जुना आहे
आधी लोक जंगली गवत आणि धान्य दळून पीठ बनवायचे आणि नंतर ब्रेड
हा ब्रेड दगडांना गरम करुन बनवला जायचा,त्यास फ्लॅट ब्रेट म्हटले जायचे
पहिल्यांदा खमीर ब्रेड इजिप्तमध्ये ४ हजार वर्षांपूर्वी बनवला गेला
त्यांना आढळले की पीठ हवेत उघड्यावर ठेवले तर फर्मेंटेशन होते,याने ब्रेड फुलतो
यानंतर युरोपात फुललेला ब्रेड अनेक प्रकारे तयार केला जाऊ लागला
सुरुवातीला श्रीमंत लोक पांढरा ( रिफाईंड ) ब्रेड खायचे, तर गरीब लोक भूशाचा जाडा ब्रेड खायचे
काळासोबत ब्रेड जगात सर्वत्र खाऊ जाऊ लागला-वेगवेगळ्या नावाने ओळखला गेला
उदा. भारतात रोटी-नान,मध्य पूर्वेत पीटा-ब्रेड,युरोपात बगेट,क्रोसॉ आणि अमेरिकेत सँडविच ब्रेड आदी
ब्रेड जगभर इतका प्रसिद्ध झाला की रोजगाराचे प्रतिक बनला,म्हणून इंग्रजीत Breadwinner चा अर्थ घरचा कमवता असा आहे
पाणी न पिता बराच काळ तग धरणारे 6 प्राणी कोणते ?