15 August 2025
Created By: Atul Kamble
29 August 2025
Created By: Atul Kamble
नारळ पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स असतात. पोटॅशियम, सोडीयम आणि मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे नारळ पाणी नैसर्गिक ड्रींक आहे
याशिवाय यात कार्बोहायड्रेट,फायबर,विटामिन सी आणि काही विटामिन बी देखील असते
नारळपाण्यात कॅलरी कमी असते. त्यामुळे अनेकांना याने वजन कमी होते असे वाटते. पण खरे काय ?
परंतू डॉक्टरांच्या मते वजन घटण्यास नारळपाणी थेट जबाबदार नाही. एक हेल्थी डाएट आणि चांगली लाईफस्टाईनचा हिस्सा म्हणून ते पिऊ शकता
नारळपाण्यात इलेक्ट्रोलाइट्स आणि पोटॅशियम कंटेट असल्याने ते बॉडीला हायड्रेट राखते,एसिड रिफ्लक्स आणि हायब्लड प्रेशरला नियंत्रित राखण्यास मदत करते
किडनी स्टोनमध्येही हे मदत करते. कमी शुगर आणि पॉटेशियम असल्याने स्पोर्ट्स ड्रीक म्हणूनही पिऊ शकतो
हे वजन कमी करणे, पीरियडचे दुखणे वा डिप्रेशन कमी करण्यास मदत करु शकते. परंतू ठोस रिसर्च झालेले नाही. त्यामुळे थेट वजन कमी करण्यास मदत होते असे म्हणू शकत नाही.
एक कप नारियल पाण्यात ४५ ते ६० किलो कॅलरी असते. एक वयस्क व्यक्ती नारळ पाणी पिऊ शकतो.किडनी, हृदय वा ब्लड शुगरच्या समस्या असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन प्या