15 August 2025

Created By: Atul Kamble

जास्त झोप येत असेल तर या विटामिन्सची असू शकते कमतरता 

29 August 2025

Created By: Atul Kamble

चांगली झोप शरीरासाठी गरजेची असते, परंतू अनेकदा झोप खूपच येते.

 जास्त झोप येणे प्रकृतीसाठी धोकादायक ठरु शकते,विटामिन्सच्या कमतरतेमुळेही अधिक झोप येते.

एनर्जीचा सर्वात मोठा सोर्स विटामिन B12आहे.रक्तातील लालपेशी त्यामुळे वाढतात.याच्या कमतरतेने थकवा जाणवतो आणि झोप जास्त येते.

विटामिन B12 ची कमतरता दूर करण्यासाठी दूध, दही, अंडी, मासे आणि पनीर खाण्याचा सल्ला दिला जातो.

आयर्नच्या कमतरतेने मेंदू आणि शरीरास पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही,त्यामुळे थकवा आणि झोप जास्त येते.

पालक सारख्या  पालेभाज्या, बीन्स, मटण आणि मसूरच्या डाळीत जास्त आयर्न असते.

 विटामिन डीच्या कमतरतेने जादा थकवा येतो त्यामुळे जास्त झोप येते.

विटामिन डीसाठी सकाळच्या उन्हात बसावे.तसेच दूध,दही,मशरुम, मासे आणि अंड्यात विटामिन डी असते.

 अधिक झोप येण्याचे कारण शरीरात मॅग्नेशियमची कमतरता होते.हे शरीराला रिलॅक्स करते आणि झोपेची गुणवत्ता वाढवते.

मॅग्नेशियमची कमी दूर करण्यासाठी बदाम,पालक,भोपळ्याच्या बिया, केळी आणि काजूसेवनाचा सल्ला दिला जातो.