साप धोकादायक प्राणी आहे. त्याच्या दंशाने व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.
1 March 2025
साप धोकादायक असला तरी त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक्ता असते.
चित्रपटांमध्ये सापांच्या जोडीपैकी एकाला मारले तर दुसरा बदला घेतो, असे दाखवले असते.
विज्ञानानुसार साप हे बदला घेणारे नसतात. सापाचा मेंदू काही लक्षात ठेवण्याइतका विकसित झालेला नाही.
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या म्हणण्यानुसार, साप बदला घेतात या दाव्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही.
सापाला मारल्यावर त्याच्या गुदद्वारातून एक प्रकारचे रसायन बाहेर पडते. त्या रसायनाच्या वासाने जवळ असणारा साप आकर्षित होतो. त्याचा अर्थ तो बदला घेण्यासाठी आला आहे, असे नाही.
भारतात साप आणि सर्पदंशाबद्दल अनेक गैरसमज, कथा-कहाण्या प्रचलित आहेत.
भारतात सापांच्या 300 जाती आहेत. पण त्यातील केवळ 60 जाती या विषारी आहेत. त्यापैकी चार साप हे अत्यंत हानीकारक आहेत.