सकाळी चुकूनही ही 7 कामे करु नका,अन्यथा पोट होईल खराब

25 september 2025

Created By: Atul Kamble

हार्वर्डचे गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट डॉ.सौरभ सेठ यांनी इंस्टाग्रामवर सकाळच्या काही सवयी गट हेल्थ खराब करतात असे सांगितले आहे

सकाळच्या नाश्त्यात फायबर,प्रोटीन आणि कार्ब्स भरपूर असावे, जर तुम्ही साखरेचे पदार्थ खाल तर तुमचे पोटाचे आरोग्य बिघडते

सकाळी उठल्यानंतर फोन चेक करण्याच्या सवयीचा थेट परिणाम मेंदूवर होतो.म्हणून फोनपासून दूर रहावे

घाईघाईने शौच उरकल्याने पचन तंत्रावर परिणाम होतो. त्यामुळे बद्धकोष्ठतेसारखी समस्या होऊ शकते,लवकर उठून आरामात शौच करावे

 टॉयलेटमध्ये फोनचा वापर करणे धोकादायक आहे. याने बॅक्टेरियाचा धोका वाढतो आणि मुळव्याधीचा धोका देखील वाढतो

 प्रोटीन स्नायूंची वाढ - एनर्जीसाठी चांगले असते.नाश्त्यात प्रोटीन नसेल तर एनर्जी लेव्हल कमी होते. भूकही लवकर लागते

सकाळचे कोवळे ऊन विटामिन डीचा चांगला स्रोत आहे.त्याने विटामिन डीची कमतरता भरुन निघते