5 october 2025
Created By: Atul Kamble
आपली पचन यंत्रणा किती मजबूत आहे त्यावर आपले आरोग्य अवलंबून असते,आयुर्वेदानुसार बहुतेक आजार पोटातून सुरु होतात
पोट साफ न झाल्याने शरीरात अनेक त्रास सुरु होतात. पोटदुखी, पोट फुगणे, गॅस, एसिडीटी याचा त्यात समावेश आहे
तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर रात्री झोपण्याआधी कोमट पाण्यातून काही पदार्थ टाकून पिल्यास सकाळी पोट साफ होते
आयुर्वेदानुसार त्रिफळा बद्धकोष्ठता दूर करुन पोट साफ करतो, आतड्यांना निरोगी राखतो
रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यात टाकून प्यायल्यास सकाळी पोट साफ होते
जिरे पोटासाठी खूप चांगले मानले जाते, याने गॅस कमी होतो, पचन क्रिया सुधारते
अर्धा चमचा जिरे पावडर कोमट पाण्यात मिक्स करुन रात्री झोपण्यापूर्वी हे मिश्रण प्यावे
एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबूचा रस आणि एक चमचा मध मिसळा, या झोपण्यापूर्वी प्यायल्यास पचन यंत्रणा सक्रीय रहाते
( डिस्क्लेमर- ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या )