रात्री झोपण्याआधी केळ खाणे  योग्य की अयोग्य ?

5 october 2025

Created By: Atul Kamble

केळी आरोग्यासाठी चांगली असतात. लोक सकाळी नाश्त्यात किंवा दिवसा केळी खातात

परंतू रात्री झोपण्यापूर्वी केळ खाणे चांगले असते का ? याचा प्रकृतीवर काय परिणाम होतो ?

आयुर्वेदानुसार रात्री केळ खाऊ नये.असे केल्याने सर्दी-खोकला-कफासारखा त्रास होऊ शकतो

रात्री केळ खाल्ल्याने पोटात सूज,गॅस आणि जुलाब सहित पचनाची समस्या होऊ शकते, केळातील फायबरमुळे असे होऊ शकते

केळात नॅचरल शुगर असते.त्यामुळे रक्तातील साखर वाढू शकते.त्यामुळे डायबिटीजच्या रुग्णाने केळी खाताना सावध रहावे

कार्बोहायड्रेटमुळे केळात कॅलरी जास्त असते. रात्रीच्या वेळी केळ खाल्ल्याने वजन वाढू शकते

अनेक लोकांना केळ खाल्ल्याने सूज आणि एलर्जीची समस्या होऊ शकते. त्यामुळे रात्री केळ शक्यतो खाऊ नये

( डिस्क्लेमर- ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या )