30 दिवस कोमट पाण्यात काळीमिरी टाकून प्यायल्यास काय होतो फायदा ?

4 october 2025

Created By: Atul Kamble

काळीमिरीचा वापर भारतात मसाल्यात होतो. परंतू तिचे औषधी गुण खूप आहेत

 काळीमिरीत अनेक एंटी ऑक्सिडेंट्स आणि एंटी इंफ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात,त्या शरीराचे रक्षण करतात

काळीमिरी पचन शक्ती वाढवते.सर्दी-खोकल्यात आराम देते.मेटाबॉलिझम वाढवते आणि वजन घटवण्यात मदत करते

 काळीमिरी पोटातील हायड्रोक्लोरिक एसिड वाढवते,त्याने पचनशक्ती वाढून जेवण चांगले पचते.

यातील एंटी-बॅक्टेरियल आणि एंटी इंफ्लेमेटरी गुण खोकला,सर्दी आणि घशाची खवखव कमी करते

मधासोबत काळीमिरीचे सेवन केले तर आणखीनच लाभ शरीराला मिळतात

काळीमिरीत पिपेरिन असते त्यातील थर्मोजेनिक घटकाने मेटाबॉलिझम वेगाने होते,कॅलरी बर्न होते आणि चरबी वितळून वजन कमी होते

 मात्र, वजन कमी करण्यासाठी संतुलित आहारासोबत व्यायाम करणेही महत्वाचे असते

काळीमिरीत पिपरिन शरीराला फ्री रेडिकल्सपासून लढायला ताकद देतो.त्यामुळे वय वाढण्याची प्रक्रिया संथ गतीने होते.चेहऱ्यावर सुरुकुत्या लवकर पडत नाहीत

( डिस्क्लेमर - ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या )