तरुण दिसण्यासाठी खा हे 5 विटामिन्स E युक्त देशी फूड्स

1 september 2025

Created By: Atul Kamble

चेहरा टवटवीत दिसण्यासाठी क्रिम वा फेसपॅकचा वापर करुन कंटाळला असाल तर हा देशी उपाय चांगला आहे

तुम्ही रोजच्या आहारात काय खाता यावर तुमच्या त्वचेचे आरोग्य अवलंबून असते, हेल्दी स्कीनसाठी विटामिन ई गरजेचे असते

विटामिन ई तुमच्या स्कीनला डॅमेजपासून वाचवते. वेळेआधी येणाऱ्या सुरकुत्यांपासून वाचवते

काही व्हेजेटेरियन फूड्स खाल्याने शरीरास विटामिन्स ई चा मुबलक पुरवठा होतो

 बदामात विटामिन ई असते.यात हेल्दी फॅट्स देखील असतात,त्याने स्कीन हायड्रेटेड आणि मुलायम रहाते

सुर्यफुलांच्या बियात विटामिन ईचे प्रमाण खूप जास्त असते,रोज दोन चमचे बिया खाल्ल्याने शरीराची अर्ध्याहून अधिक गरज भागते

पालकमध्ये केवळ आयर्नच नाही तर विटामिन ई देखील असते. एक कप शिजवलेल्या पालकने रोजच्या गरजेच्या 20 टक्के विटामिन मिळते

 एव्हाकाडोत विटामिन ई आणि हेल्दी फॅट्स दोन्ही असते.रोज अर्धे फळ खाल्ले तरी शरीराच्या गरजेच्या 15 टक्के विटामिन मिळते

भुईमुगाच्या शेंगात विटामिन ई असते. रोज विनासाखरेचा नॅचरल पिनट बटर खाल्ल्याने शरीराच्या गरजेच्या 10 टक्के विटामिन मिळते