वजन कमी करण्यासोबतच शरीराच्या योग्य पोषणासाठी (ड्राय फ्रूटस) सुका मेवा उपयुक्त ठरतो.

1 July 2025

सुका मेव्यात पोषक घटक असतात. त्यामुळे भूक देखील नियंत्रणात राहाते. यामुळे सुका मेवा आहारात ठेवून वजन कमी करता येते. 

बदामात प्रोटीन आणि हेल्दी फॅट असतात. त्यामुळे दीर्घ काळ पोट भरलेले असते. भूक लागत नाही. यामुळे एक मूठ भिजवलेले बदाम डायटमध्ये घ्या.

वजन कमी करण्यासाठी आक्रोड महत्त्वाचे आहे. यामध्ये प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतात. भूक लागल्यावर आक्रोड खाल्ल्यास भूक त्वरित शमते.

भूक लागल्यावर बेदाणे खाल्ले तरी पोट भरते. एकदा बेदाणे खाल्ले की खूप वेळ काही खाण्याची इच्छा होत नाही.

काजू जास्त प्रमाणात खाल्ल्यास वजन वाढते. परंतु योग्य प्रमाणात काजू खाल्ल्यास वजन कमीही होते.

खजुरात असलेल्या कॅल्शियम आणि फॉस्फरसचा फायदा आरोग्य सुधारण्यासाठी होतो. यामुळे पोट भरलेले असते.