मान्सूनमध्ये डोळ्यांची येते साथ, कशी काळजी घ्याल, वाचा

28 June 2025

Created By: Atul Kamble

मान्सून जरी आल्हाददायक असला तरी बॅक्टेरीया याच काळात तयार होतात, डोळ्यांची काळजी घ्यावी लागते

पावसात कंजंक्टिवाईटिस ( डोळे येणे ) एलर्जी आणि अन्य इन्फेक्शनची धोका वाढतो.डोळ्यांचे आरोग्य जपावे लागते

 पावसाचे घाण पाणी किंवा बॅक्टेरियाच्या संपर्कात आल्याने डोळ्यांना इन्फेक्शन होऊ शकते. डोळ्यांना हात लावून नये

चष्मा असेल तर स्वत:चा चष्मा आणि टॉवेल, रुमाल शेअर करु नका. डोळ्यात जळजळ वाटत असेल स्वच्छ थंड पाण्याने डोळे धुवावेत

मान्सूनमध्ये आद्रतेने एलर्जी किंवा डोळे येण्याचा धोका असतो. डोळे लालसर झाले, खाज येत असल तर डॉक्टरांना त्वरित भेटा, सल्ल्याशिवाय आयड्रॉप मनाने वापरु नये

विटामिन्स A आणि C युक्त आहार घ्या. गाजर,पालक,संत्री खा. पाणी भूरपूर प्या, निरोगी राहा

डोळ्यात जर टोचत असेल तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधं घ्यावीत आणि आराम करावा