IAS च्या बनवण्याची अनेकांची यशोगाथा तुम्ही वाचली आहे. 

1 जून 2025

एक व्यक्तीने आयएएस झाल्यानंतर नोकरीचा राजीनामा देत चित्रपट निर्मितीचे काम सुरु केले. 

आयएएसचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी बनवलेला पाहिला चित्रपट फ्लॉप राहिला. त्यानंतर त्यांनी चिकाटी सोडली नाही. डॉक्यूमेंट्री बनवून राष्ट्रीय पुरस्कार मिळवला.

1982 च्या बॅचचे IAS पापा राव बियाला उर्फ बीव्हीपी राव यांनी हे यश मिळवले. त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली होती.

बीव्हीपी राव आसामचे गृहसचिव (1994–97), यूनोत सिव्हिल अफेयर्स ऑफिसर (1999), तेलंगणा सरकारमध्ये नीती सल्लागार (2014–19) राहिले आहे. 

1990 च्या दशकात त्यांना चित्रपटांमध्ये आवड निर्माण झाली. निर्माते जाह्नु बरुआ यांच्याकडून त्यांनी निर्मितीचे धडे घेतले.