11 october 2025
Created By: Atul Kamble
बद्धकोष्ठतेला अनेक कारणे जबाबदार असतात. फायबरची कमी, पाण्याची कमतरता आणि चुकीच्या आहाराची सवय त्यास आमंत्रण देते.
काही विशिष्ट पदार्थाने हमखास बद्धकोष्ठता होते. असे पदार्थ कोणतेही ते पाहूयात...
दूध आणि त्यापासून तयार झालेली उत्पादने, उदा. पनीर आदी बद्धकोष्ठतेस निमंत्रण देते. यातील लॅक्टोज अनेकांना पचत नाही. याने पोटात गॅस आणि सूज येऊ शकते.
सफेद ब्रेड, ज्यामुळे फायबरची कमी होते. पोट नीट साफ होत नाही. त्यामुळे बद्धकोष्ठता वाढते.
चिप्स, तळलेले आणि प्रोसेस्ड फूड्समध्ये जास्त फॅट असते. फायबरचे प्रमाण असते.त्यामुळे बद्धकोष्ठता वाढते.
बर्गर, पिझ्झा सारखे फूड्स जास्त फॅटी असतात. त्यामुळे बद्धकोष्ठता होते. या फूड्सने शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळत नाहीत.
प्रोसेस्ड फूड्स उदा.बिस्कीट आणि स्नॅक आदीमुळे बद्धकोष्ठता आमंत्रण मिळते. कारण यात फायबरची कमतरता असते. हे पचनाला जड असते.
चहा, कॉफीत कॅफीन आढळते. जे पचन यंत्रणेला धीमे करते. याच्या जास्त प्रमाणामुळे पाण्याची कमतरता होते. ज्यामुळे बद्धकोष्ठतेची गंभीर समस्या निर्माण होते.
बद्धकोष्ठतेपासून वाचण्यासाठी अधिकाधिक मोसमी फळे, भाज्या, सीड्स आणि ड्रायफ्रूट्सचे सेवन करावे, खूप पाणी प्यावे