11 october 2025
Created By: Atul Kamble
स्वयंपाक घरातले अनेक मसाले औषधी आहेत. हे पदार्थ नैसर्गिकरित्या वेदना कमी करण्यास मदत करतात
पेन किलर औषधे जर जास्त घेतली तर आरोग्यास हानिकारक ठरतात.त्यामुळे त्यांचा वापर कमी करायला हवा, मात्र वेदनाशामक मसाले कोणते ते पाहूयात..
जखम झाली किंवा स्नायूंना सूज, किंवा वेदना होत असतील तर हळद कामी येते.राईच्या तेलात हळद गरम करुन मुक्कामार असलेल्या जागी लावली तर आराम मिळतो
लवंग दातदुखी तसेच सर्दीमुळे डोके दुखत असेल तर कामी येते.चहात लवंग टाकून घेतल्यास सर्दीमुळे होणारा त्रास कमी होतो
ओवा पचनासाठी चांगला असतो.गॅसमुळे पोटात दुखत असेल तर ओवा खावा, ओव्याचा चहाही घेतला जातो. सर्दीत लहान मुलांना ओव्याच्या पुरचुंडीने शेकले जाते.
आल्यातील जिंजरोल घटक पीरियड्समधील दुखणे कमी करतो.तसेच सर्दी पडसे आणि डोकेदुखी तसेच सांधेदुखीत आलं फायद्याचे असते. आल्याचा चहा देखील पिता येतो
काळीमिरी स्नायूंच्या सूजेवर आराम देते. काळीमिरी वाटून कोमट दूधासोबत प्यायल्यास थकवा दूर होतो