100 रुपयात मिळेल रेल्वे स्थानकात रुम, पाहा कशी ? 

Created By: Atul Kamble

14 january 2026

रेल्वे रिटायरिंग रुम प्रवाशांसाठी रेल्वे स्थानकात झोपण्याची सोय असते. येथे एसी आणि नॉन एसी रुम,सिंगल,डबल बेड आणि डॉरमेट्रीची सुविधा असते.

रिटायरिंग रुम तेच प्रवासी बुक करु शकतात ज्यांच्याकडे कन्फर्म वा RAC तिकीट असेल.वेटिंग लिस्ट तिकीटावर ही सुविधा मिळत नाही. वैध PNRनंबर असणे बंधनकारक असते.

 ही सुविधा देशाच्या बहुतांशी मोठ्या रेल्वे स्थानकात असते.IRCTC च्या वेबसाईटवर PNR टाकून याची उपबद्धता चेक करता येते.

IRCTC ची रिटायरिंग रुम वेबसाईटवर PNR टाकून लॉगिंग करावे लागते. स्टेशन आणि रुम टाईप निवडून UPI,डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड वा नेट बँकींगने पैसे भरु शकता.

जर ऑनलाईन बुकिंग करु इच्छीत नसाल तर स्टेशनवर तिकीट काऊंटरवर जाऊन माहिती घेऊ शकता. रुम रिकामी असल्यावर तेथेच बुकींगची सुविधा मिळते.

येथे स्वच्छ बेड,एसी,बाथरुम, टॉवेल,साबण,पाणी, टीव्ही,टेबल खुर्ची आणि चहा-कॉफी बनवण्याची सुविधा मिळते.चेक इन बुकींगच्या एक तासांत करावे लागले.

भाडे रुमचा दर्जा आणि वेळेवर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे 12 ते 24 तासांसाठी बुकींग असते. खर्च सुमारे 100 रुपयांपासून सुरु होऊन 700 रुपयांपर्यंत असतो.

ऑनलाईन बुकींग केवळ ऑनलाईनच रद्द करता येते. रिफंड कमाल सात दिवसात मिळतो. कोणत्याही समस्येसंदर्भात स्टेशन अधिकारी किंवा सर्व्हीस प्रोव्हायडरशी थेट तक्रार करु शकता.