थंडीत कोणत्या प्रकृतीच्या लोकांनी दही खाऊ नये ?

Created By: Atul Kamble

11 january 2026

दही शरीरासाठी फायदेशीर असते. परंतू थंडीत काही लोकांनी दही खाण्यापासून दूर राहिले पाहिजे

डॉ.सुभाष गिरी यांच्या मते दह्याचा प्रवृत्ती थंड आहे. त्यामुळे ज्यांना वारंवार सर्दी होते. खोकला आणि ताप येतो त्यांनी दही खाऊ नये.

ज्यांचे पचन कमजोर आहे त्यांनी थंडीत दही सेवनाने गॅस,अपचन आणि पोट जड राहणे असे त्रास होऊ शकतात.कारण थंडीत पचन क्रिया मंद असते.

थंडीत ज्यांना सांधेदुखी असते, सांधे सुजत असतील त्यांनी दही सेवन मर्यादित प्रमाणात करावे.

 थंडी रात्रीच्यावेळी दही खाणे नुकसानकारक होते.यामुळे कफ वाढतो.पोटाच्या समस्या येऊ शकतात.त्यामुळे रात्रीचे दही कटाक्षाने टाळावे

ज्यांना घशात खवखव होते, आवाज बसतो.त्यांनी थंडीच दही खाऊ नये. कारण त्यामुळे छातीत कफ तयार होऊ शकतो.

सायनस वा एलर्जीने पिडीत असलेल्या लोकांनी थंडीत दही खाऊ नये. ज्यामुळे डोकदुखी, नाकबंद आणि श्वास घेण्यास त्रास घेण्यास त्रास होऊ शकतो.