आले असणारी चहा घरा घरात घेतली जाते. आल्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. 

3 March 2025

चहा अधिक चवदार करण्याचे काम आले करत असते. पावसाळ्यात आले असणारी चहा घेणे आरोग्यदायी आहे.

आले फळ आहे की भाजी? हा प्रश्न अनेकांना पडत असेल. त्याचे उत्तर तुम्हाला देणार आहोत.

आले हे फळ किंवा भाजी नाही. हे एक राइझोम आहे, जे वनस्पतीचे भूमिगत स्टेम आहे. 

आल्याचा सामान्यतः वापरला जाणारा भाग म्हणजे राईझोम, जो त्याच्या सुगंधी आणि मसालेदार चवसाठी ओळखला जातो.

स्वयंपाकाच्या संदर्भात आले बहुतेकदा भाज्यांसारखेच मानले जाते. परंतु वनस्पतिशास्त्रानुसार, ते त्या श्रेणींमध्ये बसत नाही.

आले ना फळ आहे ना भाजी आहे. आले एक मसाले आहे. 

आले सुकवल्यावर त्यापासून सुंट तयार केले जाते. त्याचा उपयोग प्रत्येकाच्या घरात केले जातो.