GK : देशाची सर्वात छोटी नदी कोणती ?

3 नोव्हेंबर 2026

created by : atul kamble

देशाच्या सर्वात छोट्या नदीचा उल्लेख होतो, तेव्हा राजस्थानच्या अरवरी नदीचे नाव समोर येते.

ही नदीच्या राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातून वाहते. आणि तिचा उगम थानागाजीच्या जवळ सकरा डॅमच्या आसपास होतो.

 अरवरी नदीची एकूण लांबी ४५ किमी आहे आणि बेसिन क्षेत्र ४९२ चौरस किमीचे आहे. २००४ मध्ये या नदीचा इंटरनॅशनल रिव्हर प्राईज मिळाले होते.

सैंथल सागर डॅमच्या खालून अरवरी, सरसा नदीला मिळून सांवन नदी बनते. याप्रकारे हीचे नाव बदलते.

अलवर संस्थानाच्या गॅझेटियरच्या नुसार १८ व्या शतकात हीला प्रतापगड नाला म्हटले गेले होते. जिला आता अरवरी नदी म्हणतात.

१९८० मध्ये ही नदी जवळपास कोरडी झाली होती. तरुण भारत संघ आणि गावकऱ्यांनी जोहड आणि चेक डॅम तयार केले. ज्यामुळे नदी १९९५ पासून पुन्हा वाहू लागली.

१९९८ मध्ये नदीच्या व्यवस्थापनासाठी अरवरी रिव्हर पार्लेमेंट बनली. यात ७२ गावाचे प्रतिनिधी सामील आहेत.