हार्ट अटॅक नेहमी छातीत कळ येऊनच येतो असे नाही, डॉक्टरांनी सांगितली 8 लक्षणं

29 september 2025

Created By: Atul Kamble

नेहमी लोकांना वाटते की हार्ट अटॅक येताना छातीत तीव्र वेदना होतात

डॉ.रवी मलिक म्हणतात की अनेकदा सायलेंट हार्ट अटॅक देखील येतात,खास करुन डायबिटीजच्या रुग्णांना छातीत दुखत नाही

  डॉ.मलिक यांच्या मते काहींनी एसिडीटी, कमजोरी वा मसल पेन समजून दुर्लक्ष केले आणि त्यांना हृदयाची समस्या असल्याचे स्पष्ट झाले

या लक्षणाकडे दुर्लक्ष करु नका ...

1.आराम करुनही थकवा जाणवणे. 2.हलका दम लागणे

3.पोटात जडपणा किंवा अपचनासारखे वाटणे,4.छातीत हलका दबाव किंवा जडपणा जाणवणे

 5.मान, जबडा, खांदा वा पाठीत असहजता ( खास करुन महिलांमध्ये ).6.मेहनत न करता अचानक घाम येणे,खास करुन थंड घाम येणे

7.चक्कर वा उलटी येणे. 8.महिलांमध्ये आणि डाएबिटीजच्या रुग्णात असामान्य लक्षणे जाणवणे

ECG वा ट्रोपोनिन टेस्ट वेळेवर प्राण वाचवू शकते

तीव्र दुखण्याची वाट पाहू नका,हलकी लक्षणे जाणवली तरी लगेच पावले उचला