अचानक येत नाही  Heart Attack, १ महिन्याआधी मिळतात हे संकेत,दुलर्क्ष करु नका

26 september 2025

Created By: Atul Kamble

 आज तरुण असो वा म्हातारे कोणालीही हृदयविकाराचा झटका येतो.अशात लोकांचे प्राण वाचवणे कठीण होते

पण हार्ट अटॅक लगेच अचानक येत नाही. तर शरीर त्याआधी छोटे-छोटे संकेत देत असते

हृदयातील रक्तप्रवाह थांबल्यानंतर मायोकार्डियल इन्फार्कशन ( एमआय ) होते.याकडे दुर्लक्ष केले जीवघातक ठरु शकते

सुरुवातीची लक्षणे ओळखून तुम्ही वेळीच डॉक्टरांकडून उपचार घेऊ शकता. त्यामुळे लक्षणांकडे दुर्लक्ष नको

छातीवर दबाव,अडखल्यासारखे किंवा जळजळ होणे हार्ट अटॅकचे पहिले लक्षण आहे.काही खांदे, मान, जबडे किंवा हातांपर्यंत हे दुखणे पसरते तेव्हा लागलीच डॉक्टरांना भेटा

आराम करुनही कायम थकवा जाणवणे,हृदय रक्त पुरेसे पंप करु न शकल्याचे लक्षण आहे.याकडे दुर्लक्ष करु नका

आराम करुन तुम्हाला दम लागत असेल तर सावध व्हा, कमजोर हृदय फुप्फुसात पाणी जमा करु शकते.त्यामुळे श्वास घेता येत नाही.जर यावेळी हृदयातही दुखत असेल तर डॉक्टरांना लगेच भेटा

चक्कर येणे, बेशुद्ध पडणे किंवा अंगात ताकद नसणे हे सर्व हृदय रक्त संचार करत नसेल तर होते.यामुळे ब्लडप्रेशर कमी झाले असेल किंवा हृदयाचे ठोके अनियमित होत असतील तर डॉक्टरांना लगेच भेटा

 हृदय वेगाने धडधड करत असेल तर हृदयावर ताण आहे.यासोबत छाती दुखत असेल आणि चक्कर येत असेल तर डॉक्टरांना भेटा